निवडणुका जवळ येत आहे तसा तसे आपली पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय नेते वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मतदार यादीतून नावे गाळण्याचे षडयंत्र जोरात सुरू आहे. विशेषतः प्रत्येक वार्डातील मराठी नावे कमी करण्यासाठी मतदार यादीचे काम करणाऱ्या खासगी यंत्रणेला मॅनेज करण्याचा डाव शिजला आहे, यामुळे जागरूक मतदारांनी आपली नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी जागे होण्याची गरज आहे.
यापूर्वी पालिका आणि विधानसभा निवडणुकीवेळी नावे च मतदार यादीतून वगळण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. ऐनवेळी के करता न आल्याने काही राजकीय शक्तींची पोळी भाजली गेली. किमान यापुढे तरी शहाणे होण्याची गरम आहे अन्यथा पुन्हा असाच प्रकार होऊ शकतो याचे भान बाळगले पाहिजे.
मतदानाचा भारतीय राज्य घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेला अधिकार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणें हे सर्वांचेच कर्तव्य आहे. आणि तो अधिकारही आहे,
तांत्रिक दृष्ट्या किंवा सरकारी यंत्रणा हाताशी धरून शेकडो मतदारांची नाव यादीतून डिलीट झाल्याची माहिती बेळगाव live कडे उपलब्ध झाली आहे त्यामुळे प्रत्येकानं आपलं किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणे गरजेचं बनलं आहे.जर मतदार यादीतून नाव गायब झाल्यास नवीन अर्ज भरून ते नाव पुन्हा समाविष्ट करता येते.
स्वतःला उमेदवारी हवी यासाठी आटापिटा करणाऱ्या नेत्यांनी आणि एकी साठी झटणाऱ्या पाईकांनी युवकांनी देखील इकडे गंभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मागील महा पालिका आणि विधानसभा निवडणुकी अगोदर बऱ्याच मतदारांची नाव डिलीट झाली होती हा अनुभव लक्षात घेता प्रत्येकाने आपापली नावं मतदारयादीत आहेत की नाही याची आजच शहानिशा करून घेणेच फायदेशीर ठरेल.