पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिर येथे रंग पंचमीच्या निमित्ताने लोटांगण हा सालाबादचा महोत्सव साजरा झाला. धार्मिक परंपरा जपत हा उत्सव साजरा करण्यासाठी शेकडो भाविक दाखल झाले होते.
दरवर्षी फक्त रंगपंचमीस अश्वत्थामास दर्शन घेण्याची सोय आहे. या उत्सवात रंगात न्हाऊन निघालेले भाविक या मंदिरा शेजारी लोटांगण घालतात. आपल्या वेगवेगळ्या मागण्या या देवा समोर मांडून त्या पूर्ण होण्याची मागणी करतात.
दरवर्षी रंग पंचमीला लोटांगणाची प्रथा पार पाडली जाते. मागणी पूर्ण झालेले भाविकही लोटांगण घालण्यास उपस्थित राहतात. गल्लीतील नागरिक लोटांगण घालणाऱ्या नागरिकांना पाणी मारून सहकार्य करतात.
पांगुळ गल्लीतील ही प्रथा गेली कित्येक वर्षे सुरू आहे, बेळगाव च्या जनतेने ही प्रथा जपुन ठेवली असुन रंगाच्या सणाचे पावित्र्य जपले जात आहे.