गल्लोगल्ली रेन डान्स, पाण्याचा मोठा अपव्यय, तरुणांना अंगावरील कपड्याचे भान नाही, आणि तरुणींना तर नाहीच नाही. नव्या परिभाषेत होळीचा सण उत्साहात साजरा झाला पण भान न ठेवता ते हरपून झाला.
एकमेकांवर रंगाची उधळण करायची आणि शुभेच्छा द्यायच्या हे या सणाचे मुख्य स्वरूप. पण काही वर्षांत याचे चित्र बदलत चालले आहे. मध्याच्या धुंदीत कसेतरी ओरडत आणि नकोत्या गोष्टी करत, किंचाळत, छेड काढत होळीचा सण साजरा करण्याची पद्धत वाढत चालली आहे.
कोरड्या रंगांचा वापर करा हे आवाहन पाणी महत्वाचे आहे असे मानणाऱ्या सर्व लोकांनी केले. मात्र त्यांच्यावरच टीका करून जितके वाया घालवायचे तितके पाणी वाया घालवून झाले आहे. एक दोन जाहीर राजकीय कार्यक्रम आणि गल्लीत गल्लीत तीच परिस्थिती यामुळे पाणी मोठ्याप्रमाणात वाया घालवण्यात आले.
बेळगावात नवी आधुनिक संस्कृती आली, शहर स्मार्ट सीटी झाले तरी लोकांचे विचार अजून स्मार्ट व्हायला वेळ लागेल यात शंका नाही.