बेळगाव महा पालिकेच्या इतिहासात पती पत्नींना महापौर आणि उपमहापौर पद प्रथमच चालून आल आहे. गुरुवारी दुपारी प्रभाग १३ च्या नगरसेविका मधुश्री पुजारी यांची उपमहापौर पदी निवड झाली त्यानंतर पती अप्पासाहेब हे महापौर पद भूषवलेले तर पत्नी मधुश्री यांना उपमहापौर पद मिळवलेली पालिकेच्या इतिहासातील पहिली जोडी आहे.
प्रकृती अस्वस्थाने पालिकेच्या राजकारणा पासून दूर असलेल्या आमदार संभाजी पाटील यांनी अचानक गुरुवारी सकाळी निवडणूक प्रक्रियेत उडी टाकली आणि मधुश्री पुजारी यांच्या पारड्यात आपल मत टाकल आणि आता पर्यंत पालिकेत जी किंग मेकरची भूमिका बजावत होते ती सार्थ ठरवली. मागील महापौर निवडणुकी पासून आमदार पाटलांचे खंदे समर्थक मानले जाणारे अप्पासाहेब हे आमदारांवर काही प्रमाणात नाराज होते मात्र या शेवटच्या कार्यकाळात पुजारी यांना उपमहापौर बहाल करून त्यांना एक प्रकारे न्यायच दिला आहे.
मधुश्री पुजारी यांचे पती अप्पासाहेब पुजारी यांनी १९९८ -९९ कार्यकाळात संभाजी पाटीलयांच्याच आशीर्वादाने ते महापौर पद भूषविल होत आता त्यांच्या पत्नी देखील संभाजी पाटील यांच्या मुळेच उपमहापौर पदी बसल्या आहेत हे कुणीही नाकारू शकत नाही.
महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमात असे आल्याने ३२ पैकी एकही मराठी नगरसेवक या आरक्षणास पात्र नव्हता महापौर पद विरोधी कन्नड गटाकडे जाणार हे सर्वश्रुत होते मात्र उपमहापौर पद मिळवण्यासठी मधुश्री पुजारी आणि मेघा हळदणकर यांच्यात चुरस निर्माण झाली होती यासाठी गुप्त मतदान देखील झाले होते मात्र शेवटच्या क्षणी आमदार संभाजी पाटील यांनी पुजारी यांना उपमहापौर करा अशी सर्व सदस्यांना विनंती केल्यावर गुप्त मतदान जाहीर केलच नाही आणि पुजारी यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला.