बेळगाव महा पालिकेच्या महापौर पदी प्रभाग 54 बसप्पा चिकलदिनी यांची बिन विरोध निवड करण्यात आली तर उपमहापौर पदाच्या झालेल्या निवडणुकीत प्रभाग 13 च्या नगरसेविका मधूश्री पुजारी या विजयी झाल्या.
गुरुवारी पालिका सभागृहात झालेल्या निवडणुकीत प्रादेशिक आयुक्त निवडणूक अधिकारी पी ए मेघन्नावर यांनी निवडीची घोषणा केली.
उपमहापौर निवडणूकित शांता उप्पार 23 नगरसेवकानी मतदान केलं तर मधूश्री पुजारी यांना 31 मते पडली. मतदानाचा अधिकार असलेल्या एकूण 63 जना पैकी दोन नगरसेवक, पाच लोक प्रतिनिधी गैरहजर होते.एरव्ही पालिकेत सक्रीय असलेले आमदार फिरोज सेठ हे देखील मतदानाला अनुपस्थित होते
महापौर निवडणुकीत अनुसूचित जमात आरक्षण आल्याने केवळ बसप्पा चिकलदिनी या कन्नड गटातील एकमेव नगरसेवकाने अर्ज दाखल केला होता तर उपमहापौर निवडणुकीत मधूश्री यांनी दोन पुजारी शांता उप्पार,मीनाक्षी चिगरे मेघा हळदणकर यांनी अर्ज दाखल केला होता सुचकाची सही दोनदा केल्याने एक अर्ज रद्द बातल ठरवण्यात आला होता.मीनाक्षी चिगरे मेघा हळदणकर यांनी अर्ज मागे घेतले. निवडणुक प्रक्रियेची सुरुवात नाड गीताने तर शेवट राष्ट्र गीताने झाली.
कामकाज मराठीत करा- आमदारांची मागणी
पालिका सभागृहात अर्ध्याहून अधिक मराठी सदस्य संख्या असल्याने कामकाज मराठीतून करा अशी मागणी गटनेते पंढरी परब आणि आमदार संभाजी पाटील यांनी निवडणूक प्राक्रिया सुरू होताच केली मात्र राज्य भाषा कन्नड असल्याने सभागृहाचे कामकाज कन्नड मध्येच कन्नड मध्येच होईल असे निवडणूक अधिकारी प्रादेशिक आयुक्त पी ए मेघन्नावर यांनी स्पष्ट केलं. सर्व सदस्यांना कन्नड भाषा कळते ती प्रशासकीय भाषा आहे राजकारण करू नका अशी विनंती नगरसेवक रमेश सोंटक्की यांनी केली.