महापौर पदी प्रभाग 54 चे नगरसेवक बसप्पा चिकलदिनी यांची निवड निश्चित झाल्यानंतर उपमहापौर पदी देखील प्रभाग 13 चे नगरसेविका मधूश्री पुजारी यांची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपमहापौर पदा साठी मराठी गटातून मेघा हळदणकर, मधूश्री पुजारी आणि मीनाक्षी चिगरे तर कन्नड गटातून शांता उप्पार यांनी अर्ज दाखल केले होते. सकाळी महापौर कक्षात आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वात मराठी गटाची बैठक झाली .24 नगरसेवकांनी आंबोलीत तर 5 जणांनी बैठकीवेळी गुप्त मतदान केलं त्यात मधूश्री पुजारी यांना जास्त मते पडल्याने मेघा हळदणकर आणि मीनाक्षी चिगरे यांनी निर्धारित वेळेत अर्ज माघारी घेणार असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे उपमहापौर पदासाठी कन्नड आणि मराठी गटात मतदान होणार आहे. मधूश्री पुजारी आणि शांता उपार यांच्यात मतदान होणार आहे. पालिका सभागृहात मराठी नगरसेवक संख्या 32 तर कन्नड गटाची 25 संख्या असल्याने पुजारी यांची निवड निश्चित मानली जात आहे.