खासदार सुरेश अंगडी यांनी बेळगावच्या ऑटो नगर येथील अनधिकृत कत्तलखान्या प्रकरणात उच्चस्तरिय चौकशीची मागणी केली आहे. भाजप नेत्यांनी येथे बांगलादेशी कामगार अनधिकृतपणे काम करत असल्याचा आरोप केला असून या साऱ्या बेकायदेशीर दरबाराला आमदार फिरोज शेठ हेच पाठींबा देत असल्याचा आरोपही केला आहे.
आज माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर व इतर भाजप नेते या कत्तल खान्यांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. आमदाराच्या दाबावाखालील पोलिसांनी योग्य चौकशी केली नाही. वारंवार तक्रार करून देखील तिथे काम करणाऱ्यांचे पासपोर्ट तपासले नाहीत. कमीतकमी ५० बांगलादेशी तेथे काम करत असून रामतीर्थ नगर येथील एक अपार्टमेंट मध्ये ते राहत आहेत. त्यांना हा अधिकार जुनी दिला ते भारताचे नागरिक आहेत काय? असे प्रश्नही भाजपने उचलले आहेत.
आमदार आणि त्यांचा भाऊ या प्रकरणात का हस्तक्षेप करत आहेत? याची पोलिसांनी दबावाखाली न येता चौकशी करावी अशी मागणी भाजप कडून होत आहे.