व्यवस्थित रेंज मिळत नसल्याने बेळगावच्या कॅम्प भागात मोबाईल नेटवर्क ची समस्या होती. कॅन्टोन्मेंट बोर्डाने तीन ठिकाणी टॉवर उभारणीस परवानगी दिल्याने आता चांगले मोबाईल नेटवर्क मिळेल.
मोबाईल रेंज ची समस्या कॅम्प भागातील लोकांना त्रासाची ठरत आहे. काही भागात तर नेटवर्क येतच नसल्याने फोन करणे कठीण होते. इंडस टॉवर्स ने योग्य पाहणी करून ही समस्या सोडवण्यासाठी तीन ठिकाणी टॉवर ची गरज कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लक्षात आणून दिली. बेवूर रोडवरील माजी सैनिक संघटनेच्या शेजारी, परेड रोड वरील पाण्याची टाकी तसेच पॉईंट रोड वर गोल्फ ग्राउंड ऑफिस नजीक हे टॉवर उभारण्याची गरज असल्याचे बोर्डाला सांगितले आहे.
आता या तीन ठिकाणांना परवानगी मिळाली की समस्या सुटू शकणार आहे.