तब्बल ३२ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर शनिवार ३१ रोजी सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे महाराष्ट्र एकीकरण समिती साठी जाहीर सभा घेत आहेत. बेळगाव शहरातील सी पी एड मैदानावर होणाऱ्या या सभेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न आणि आगामी विधान सभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पवार या सभेत समिती नेत्यांना आणि मराठी जनतेला काय मार्गदर्शन करणार याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
बारामातीहून एका खास हेलीकॉप्टर मधून पवार हे शनिवारी सकाळी दहा बेळगावला येणार आहेत त्या नंतर विविध संस्थाना भेट देेेेणार आहेत.या नंतर त्यांचा शहरातील विविध सहकारी संस्थांच्या वतीने नागरी सत्कार केला जाणार आहे सायंकाळी चार वाजता एकीकरण समितीच्या सी पी एड वरील मेळाव्यात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. कॅम्प येथील सी पी एड मैदानावर पवारांच्या सभे साठी भव्य असा पेंडाल आणि मंच उभा करण्यात आला आहे.
पवारांच्या सी पी एड मैदानावरील एकीकरण समितीच्या कार्यक्रमात सीमा लढ्यात योगदान दिलेल्या जेष्ठाचा कॉम्रेड जेष्ठ सीमा सत्याग्रही कृष्णा मेणसे, वकील राम आपटे आणि किसन येळ्ळूरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जेष्ठ नेते एन डी पाटील,आमदार संभाजी पाटील अरविंद पाटील उपमहापौर मधुश्री पुजारी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर,सरचिटणीस मालोजी अष्टेकर, शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर,खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्यासह कोल्हापूरहून देखील अनेक नेते मंडळी येणार आहेत.
अटीवर परवानगी
बेळगाव जिल्हा प्रशासनाने काही अटीवर कार्यक्रमास परवानगी दिली आहे या मेळाव्यास 40 हजार हून अधिक सीमा बांधव उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. मैदानावार २० हजार हून अधिक आसनाची सोय देखील करण्यात आली आहे.
Trending Now