बेळगावकरांचे लाडके मराठी वेबपोर्टल बेळगाव live चा पहिला वर्धापनदिन गुरूवार दि २९ रोजी सायंकाळी ५ वाजता साजरा होणार आहे.
सामनाचे संपादक खासदार संजय राऊत, मॅक्स महाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर, तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर, आमदार संभाजी पाटील व अरविंद पाटील, उप महापौर मधूश्री पुजारी तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ओपिनियन पोल च्या आधारावर या वर्षीचा बेळगावकर पुरस्कार वितरण होणार असून समस्त बेळगावकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करत आहोत.
Trending Now