बेळगाव उत्तर मतदारसंघात विध्यमान आमदार फिरोज सेठ यांना काँग्रेस पक्षाने अजिबात उमेदवारी देऊ नये , अन्यथा बेळगाव मुस्लिम फोरम विरोध करणार असून दुसऱ्या उमेदवारास पाठींबा देणार आहे स इशारा आज पत्रकार परिषद घेऊन देण्यात आला.
आपण म्हणजेच काँग्रेस पक्ष , आपण करेल तोच कायदा आणि आपलेच नातेवाईक म्हणजे पक्षाचे पदाधिकारी असा कारभार सेठ यांनी सुरू केला आहे. दंगली माजवून अनेक निरपराध युवकांवर गुन्हे दाखल करीत आपल्या दबावाखाली ठेवण्याचा कारभार ते करीत आहेत. याला आमचा विरोध आहे , यावेळी आम्ही काँग्रेस पक्ष श्रेष्टींना याची माहिती दिली असून त्यांनी ही मागणी मान्य करावीच लागणार आहे, असेही फोरम च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
फिरोज सेठ यांना आम्ही राजकारणात आणून चूक केली याबद्दल जनतेने आम्हाला माफ करावे अशी जाहीर माफीही पत्रकार परिषदेत मागण्यात आली.हाशम भावीकट्टी आणि जावेद पाशा इनामदार हे बेळगाव मुस्लिम फोरम चे उमेदवार असतील यापैकी कुणाला तर एक्त्याना उमेदवारी द्यावी अशी मागणी देखील हाय कमांड कडे केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी वफ बोर्ड अध्यक्ष सी के एस नजीर, जावेद पाशा इनामदार,हाशम भविकट्टी,के पी सी सी सदस्य बाबूलाल बागवान, मुस्लिम लीग चे दस्तगीर आगा,जे डी एस चे फैजुल माडीवले,माजी नगरसेवक फिरदोस दर्गा, अजीम पटवेगार, सादिक इनामदार,बाबाजान मतवाले आदी उपस्थित होते.