Thursday, December 5, 2024

/

एकिसंदर्भात युवकांनी घेतली शरद पवार यांची भेट

 belgaum

दि २३ मार्च रोजी मुंबई येथील प निवासस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांनी शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीत गेल्या २ महिन्यापासून म ए समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते दोन गटात विखुरलेल्या समितीच्या नेत्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तरी या कारणासाठी त्यांनी एकीसाठी सुवर्णमध्य काढावा असे निवेदन देण्यात आले,
यावेळी पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि एकिसंदर्भात जे कार्य सुरू आहे ते योग्य आहे युवकांनी पुढाकार घ्यावा आणि मी दोन्ही गटाची एकत्रित बैठक घेऊन तिढा सोडवेन असे आश्वासन दिले , व लवकरच ठोस भूमिका घेऊ असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे.Mes paikपाईकांनी शरद पवार यांना हे निवेदन दिले आहे

सन्मानीय श्री शरदचंद्र पवार साहेब
खासदार, माजी केंद्रीय संरक्षण व कृषी मंत्री,भारत सरकार

विषय:- महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या एकीसंदर्भात

आदरणीय ,
गेली 62 वर्ष कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न खोळंबून आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी तुमचे प्रयत्न हे कायम प्रभावी आणि आशादायी होते आणि आजही ते आहेत यात तिळमात्र शंका नाही. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 31मार्च 2018 रोजी बेळगाव मध्ये होणारी आपली सभा हि समस्त सीमाबांधवाना अजून एकदा आशेचा किरण निर्माण करणारी आहे.
पण या सर्व पार्श्वभूमीवर सीमाभागात निर्माण होणारी हि ऊर्जा पुन्हा दोन प्रवाहात विखुरली न जाता, त्याचा एकसंध प्रभावी प्रवाह निर्माण व्हावा यासाठी, तुम्ही वडीलकीच्या नात्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात एकी करावी अशी आमची विनंती आहे. ध्येय एक असले तरी दोन गटांच्या वेगवेगळ्या कार्यामुळे सीमाभागातील कार्यकर्त्यांची वाताहत होत आहे.
आपण आपल्या सभेपूर्वी यात गांभीर्याने लक्ष घालून हा तिडा सोडवला अशी अपेक्षा करतो

कळावे
युवा कार्यकर्ते
म. ए. समिती बेळगाव

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.