भाजप प्रणित सरकारने सत्तेवर आल्या पासून शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवला आहे. शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा डाव सुरू आहे. शेतीमालाला हमीभाव नाही आणि निर्यातबंधीचे धोरण राबवून शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आणली जाते, असल्या सरकारला बदलून शेतकऱ्याच्या हाती सत्ता आली पाहिजे, असे उदगार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी काढले.
बेळगावच्या मराठा मंदिर येथे झालेल्या मेळाव्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना तसेच तंबाखूच्या आंदोलनात बळी पडलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शेतकरी संघटनेने आयोजित जागृती यात्रेचा प्रारंभ झाला. शेती बचाव समितीचे बाळाराम पोटे, बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत आणि बेळगावचे शेतकरी उपस्थित होते.