आगामी ३१ मार्च रोजी सीमा भागाचे नेते शरद पवार यांचा सी पी एड मैदानावर होणारी सभा कोणत्या गटातटाची नाही केवळ समितीचा मेळावा म्हणून सर्वांनी मिळून यशस्वी करा असे आवाहन मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले.
शुक्रवारी सायंकाळी रंगुबाई पलेस येथे शहर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी अष्टेकर बोलत होते. शरद पवारांची सभा समितीसाठी म्हणून तब्बल ३२ वर्षांनी होत असून ऐतिहासक करू असेही अष्टेकर म्हणाले.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सभेत समितीच्या कार्यकर्त्यांनी कोणकोणते प्रोटोकॉल पाळायला हवे याचे मार्गदर्शन करत मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांनी कार्यक्रमा बाबाब्त सविस्तर माहिती सांगितली. ३१ रोजी पवार यांचा बेळगाव मुक्काम राहणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ते तुकाराम बँक ला सदिच्छा भेट देणार आहेत त्या नंतर ते गोवा मार्गे मुंबईला जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
बैठकीच्या सुरुवातीला रणजीत चव्हाण पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी शहीद भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहिली.
एक मराठा लाख मराठा मोर्चा च्या धर्तीवर संयोजकांनी कार्य करावे महिलांना गरमी पासून वाचवण्या साठी कार्य करावे अशी सूचना देखील काही कार्यकर्त्यांनी मांडली. माजी महापौर सरिता पाटील, रामचंद्र मोद्गेकर आदी यावेळी उपस्थित होते.