सिंधी समाजाचे स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारी हेमू कलानी यांची 95 व्या जयंती निमित्य हेमू कलानी चौक बेळगाव येथे पालिकेच्या वतीन सुशोभीत करण्यात आलेल्या चौकाचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
माजी महापौर सरिता पाटील,नगरसेविका रेणू मुतगेकर यांच्या विशेष प्रयत्नातून पाच लाख रुपये खर्चून हेमू कलानी चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.उपमहापौर मधूश्री पुजारी,नगरसेविका रेणू मुतगेकर यांनी कलानी चौकाचे लोकार्पण केलं.
यावेळी माजी महापौर संज्योत बांदेकर,सुधा भातकांडे,माजी नगरसेवक रणजित पाटील,समितीचे प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, गुणवन्त पाटील सुनील जाधव आदी उपस्थित होते.
सिंधी समाजाचे पंच मंडळींनीच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.अल्पोपहार देऊन कार्यक्रमा आटोपता घेण्यात आला.