शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरू यांना भगतसिंग युवक मंडळाचे अभिवादन….!
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा देणाऱ्या भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशीची शिक्षा दिली,त्यांना शुक्रवार ता २३ रोजी भगतसिंग युवक मंडळ पाटील गल्ली बेळगाव येथे अभिवादन करण्यात आले.
उपमहापौर मधूश्री पुजारी, नगरसेविका माजी उपमहापौर रेणू मुतकेकर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील,नगरसेविका सुधा भातकांडे यांनी शहीद भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांना पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
रणजित चव्हाण पाटील यांनी प्रास्ताविक करताना या चौकाचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे असे सांगितले.यावेळी मालोजी अष्टेकर,रेणू मुतकेकर,उपमहापौर मधूश्री पुजारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपमहापौर मधूश्री पुजारी यांनी या चौकाचे सुुशोभीकरणासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.सुत्रसंचलन महादेव पाटील यांनी केले.सदर कार्यक्रम या भागातील कार्यकर्ते विजय होनगेकर,विशाल गौंडाडकर, अमन खांडोळकर यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.