विणकर समाजातील ज्येष्ठ संत देवर दासीमय्या यांचे नाव अनधिकृतपणे येळ्ळूर रोड ला देण्याचा प्रयत्न युवकांनी आक्षेप घेतल्यामुळे फसला आहे.
आज या संत मातेची जयंती होती, काही राजकीय व्यक्तींच्या समर्थकांनी निवडणुकीच्या तोंडावर यावर्षी पहिल्यांदाच त्यांच्या जयंतीची मिरवणूक काढली होती, त्यावेळीच येळ्ळूर रोडवर देवर दासीमय्या रोड असा फलक लावण्यात आला, यामुळे काही तरुण संतापले होते.
विणकरांच्या संतांचे नाव विणकर वसाहतीत लावले तर ठीक आहे, मात्र जाणीवपूर्वक भाषिक वाद पेटवण्यासाठी हे नामकारण कोणतीही परवानगी नसतांना येळ्ळूर रोडवर करण्यात आल्याचा आरोप त्या तरुणांनी केल्याने प्रकरण पोलीस स्थानकात गेले.
महानगरपालिकेत ठराव झाल्याशिवाय असे कोणत्याही रस्त्याचे नाव बदलता येत नाही असा आक्षेप घेतल्याने त्या मंडळींना तो फलक काढून घेऊन परत जावे लागले, यावेळी मराठी लोकांनी विणकरांच्या संतांचा अपमान केला असा समज पसरवण्यात येत होता, पण जास्त राजकारण करता आले नाही.
राजकीय फायदा घेण्यासाठी केलेल्या अनधिकृत प्रयत्नांची चर्चा होत आहे.
Trending Now