100 रुपये बॉण्ड वर खरेदी केलेल्या जागेवर बांधण्यात आलेली घरे कारवाई करून पाडवा असा आदेश आपण दिला आहे असे सांगून काही लोक अफवा पसरवत आहेत.त्यामुळे काही संघटनां आंदोलन करत आहेत . मात्र मी तसा अधिकृत कोणताही आदेश दिला नसल्याचं स्पष्टीकरण प्रादेशिक आयुक्त पी ए मेघन्नावर यांनी केलं आहे.बुधवारी आणि गुरुवारी याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन झाली. काही लोक आंदोलन करणार आहेत.100 रुपये बॉण्ड वर खरेदी करून बांधलेली घर पाडवण्याचा अधिकार माझ्या कडे नाही त्यामुळं मी कसलाही आदेश दिला नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
काही राजकीय नेते मतदान डोळ्या समोर ठेऊन आंदोलन करणार होते ,गुरुवारी समिती नेत्यांनी दिलेल्या निवेदना नंतर मेघन्नावर यांनी आपली भूमिका स्पष्ट करून मता वर डोळा ठेऊन राजकीय स्वार्थासाठी आंदोलन करणाऱ्यांची हवाच काढली आहे.
मात्र त्यांनी यु टर्न घेतला अशीही चर्चा आहे.