खासदार सुरेश अंगडी आणि राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी केंद्रीय विमान उड्डाण मंत्री सुरेश प्रभू आणि विमान उड्डाण राज्य मंत्री जयंत सिन्हा यांची दिल्ली मुक्कामी भेट घेतली आहे.बेळगाव विमान तळास उड्डाण योजनेत सामील करून बेळगावची हवाई सेवा अनेक शहरांशी जोडा अशी मागणी केली आहे.
उड्डाण योजने अंतर्गत स्पाईस जेट ची हवाई सेवा हुबळी स्थलांतर होणार अशी माहिती समोर येत आहेत स्पाईस जेट ची बेळगावहून सुरू असलेली विमान सेवा कुठेही अन्यत्र डायव्हर्ट केली जाऊ नये अशी मागणी खासदार द्वयीनी केली आहे.