डिफेन्स च्या डेंजर झोन मध्ये खासदार सुरेश अंगडी यांनी राजकीय बळाच्या जोरावर बेकायदेशीर रित्या बुडा, महापालिका किंवा कॅटोंमेंट बोर्ड आणि मिलीटरीची परवानगी न घेता बांधलेली कॉलेजची इमारतीवर अगोदर कारवाई करावी मगच गरिबांची 100 रुपये बॉण्ड पेपरवर खरेदी करून बांधलेल्या घराबद्दल विचार करावा अशी भूमिका शेतकरी नेते नारायण सावंत शिव प्रतिष्ठानचे किरण गावडे यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्यांनी घेतली आहे.
100 रुपयेच्या बॉण्ड पेपर वर खरेदी केलेली घर पाडून टाकू असा इशारा प्रादेशिक आयुक्त पी ए मेघन्नावर यांनी दिला होता अश्या गरीब लोकांच्या घरा वर कारवाई करू नये अस निवेदन देण्यात आलं.
गुरुवारी सकाळी शहर समितीचे टी के पाटील यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात 100 रूपये बॉण्ड वर खरेदी केलेल्या घरावर कर बसवण्यात आलाय त्या भागात रस्ते ड्रीनेज पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असताना गरीब वस्तीतील घरे पाडवणे कितपत योग्य आहे?असा सवाल विचारत प्रशासनाने कारवाई करू नये काही राजकीय लोक निवडणूक डोळ्या समोर मतांच्या राजकारणासाठी वापर करत आहेत असं देखील निवेदनात म्हटले आहे.यावेळी टी के पाटील,माजी महापौर किरण सायनाक,सरिता पाटील,मोहन बेळगुंदकर,किरण गावडे,रतन मासेकर,आदी यावेळी उपस्थित होते.
संरक्षण मंत्रालया कडून खासदारांना आलेल्या पत्रांचा पुरावा देत खासदार अंगडी यांनी देशाच्या संरक्षणासाठी असलेल्या भागात अलिशान कॉलेज उभारून संरक्षण खात्यास घातक कृत्य केले आहे त्यामुळे देश हितासाठी कॉलेज इमारतीवर अगोदर कारवाई करा नंतरच गोर गरिबांच्या घराचे हिताबद्दल निर्णय घ्या असा आरोप देखील शेतकरी नेते सावंत यांनी यावेळी केला त्यावर अधिकाऱ्यांनी मागणी अर्ज पालिकेस पाठवू असं आश्वासन दिलं.