बेळगाव स्मार्ट सिटी योजनेत कार्यरत अभियंते किरण सुब्बाराव यांच्या कडे मिळाली कोटींची मालमत्ता सापडली आहे.
महा पालिकेचे अभियंते किरण सुब्बाराव भट यांच्या कडे लाचलुचपत खात्याने कोटयावधीची मालमत्ता जप्त केली आहे.ए सी बी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जप्त केलेल्या मालमत्तेची माहिती दिली आहे.
बेळगावात वास्तव्यास असलेले घर, एक प्लॉट,बंगळुरू शहरात दोन प्लॉट, एक होंडा जुझ कार,दोन दुचाकी, 1 किलो 261 ग्रॅम सोने,5 किलो 826 ग्रॅम चांदी, विविध बँकातून 37 लाखांच्या एफ डी, घरात दहा लाखांच्या मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.
अजूनही पालिकेत आणि शहरात अनेक भ्रष्ट आणि कोट्यवधीची माया गोळा केलेले अधिकारी आहेत असे बडे मासे कधी ए सी बी च्या जाळ्यात अडकणार अशी चर्चा होताना दिसत आहे.