नवरा बायकोच्या भांडणात कलहाने अनेक तुटलेले संसार आपल्या समुपदेशन कौशल्याने जोडण्यात मोलाची भूमिका बजावत असलेले शहापूर येथील समाजसेवक कर्तव्य संस्थेचे अध्यक्ष अजित सांखला यांची सलग सातव्या वर्षी कौटुंबिक न्यायालयावर उच्च न्यायालयाने फेर नियुक्ती केली आहे.बेळगाव जिल्हा कौटुंबिक न्यायालयाच्या कौन्सिलर पदी गेली सहा वर्षे सांखला यांनी कार्य केले आहे.बेळगाव जिल्हा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट किंवा पोटगी साठी दाखल झालेल्या खटल्यात जानेवारी 2012 ते 2018 पर्यंत सांखला यांनी 104 पती पत्नी यशस्वी समेट घडवून त्या जोडप्यांचा संसार जोडून दिला आहे.
समाज उधाराच्या कामी सांखला यांना कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश मंजुनाथ जी ए, तत्कालीन न्यायाधीश गोपाळ , पी जी पाटील तसेच लोक अदालतिचे न्यायाधीश किरण किणी यांच देखील मार्गदर्शन लाभलं आहे तर पती पत्नीत समेट घडविण्यासाठी अड अमिना बेग,अड संध्या देशपांडे,अड पी डी कनगली, अड चंद्रकांत लोहार,अड सुवर्णा देशपांडे यांची साथ लाभली आहे.
कौटुंबिक कलहातून निर्माण झालेल्या कोणत्याही समस्येच्या निवारणासाठी पती पत्नीनी निःशुल्क मदतीसाठी 9449307345 वर संपर्क करा असे आवाहन केलं आहे.
कधी प्राणी दया कधी पक्षी दया तर कधी पाऊस मागण्यांसाठी सर्व धर्मीय प्रार्थना अशी अनेक सामाजिक उपक्रम करणारे सांखला यांनी कुटुंब जोडण्याच सामाजिक कार्य केले असून त्याच सर्वत्र कौतुक होत आहे.