मागील दोन बैठक तहकूब केल्यानंतर तिसरी बैठक मराठीच्या मुद्यावर गाजली मराठी कागदपत्रांची मागणी करत अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांना जाब विचारणार आला, संतापलेल्या मराठी सदस्यांनी या पुढील बैठकीत जर मराठीतून कागदपत्रे दिली नाहीत तर बैठक रद्द करू असा इशारा दिला त्यानंतर अध्यक्षांनी पुढील बैठकी पर्यंत मराठीतून कागदपत्रे देऊ असे आश्वासन दिल.
तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर रावजी पाटील, काशीनाथ धर्मोजी, नारायण नलावडे, आदींनी मराठी साठी आवाज उठवला.पुढील बैठक विधान सभा निवडणुकी नंतरच होणार आहे त्यामुळे मराठी भाषिकांना खूष करण्यासाठी अध्यक्षांनी मराठीतून कागदपत्रे देण्याचं आश्वासन दिलंय मात्र त्याची पूर्तता होईल की नाही याची शाश्वती नाही.