कुडची ता.रायबाग येथे जैन धर्मीय मुनीं केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जैन धर्मीय बांधवांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करत निषेध केला.
गेल्या 17 मार्च रोजी दिगंम्बर जैन धर्मातील सौरभ सागर नावाच्या मुनीं वर एका अन्य धर्मीय युवकाने दगडफेक करत हल्ला केला होता.
जैन धर्मीय मृदु स्वभावाचे अहिंसावादी प्राणी पक्षांची, जीव जंतूंची देखील हिंसा करत नाहीत अस असताना देखील एका दुसऱ्या समाजाच्या युवकांनी मुनीं वर हल्ला करुन जखमी केले आहेत आम्ही अन्य कुणावर देखील हिंसा करत नाही मात्र आमच्या वर कुणी अन्याय केल्यास सहन देखील करत नाही अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
जैन संन्यासी वर हल्ला करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न देखील जैन समाजाने विचारला आहे.यावेळी जैन समाजाचे राजीव दोडडन्नवर, राजेंद्र जैन,राजेंद्र जक्कानांवर,हिराचंद कलमनी,भाजपचे किरण जाधव, राजेंद्र हरकुनी व्ही एच पी चे विजय जाधव आदी उपस्थित होते.