बेळगाव शहराच्या सभोवताली जाणारा रिंगरोडचा प्रस्ताव सध्या मंजुरीच्या टप्प्यात आहे. व्यवस्थित प्रकल्प तयार करून योग्य आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून हे काम पूर्ण झाले की मंजुरी दिली जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र ४अ च्या ९.५०० किमीवरून बेळगाव बायपास सुरू होणार आहे. तो ५१५ किमीपर्यंत असेल. याच दरम्यान छेद देऊन रिंगरोड उभारला जाईल.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सल्लागार कंपनी कडून सल्ला मागवला आहे. हा रस्ता झाला की शहराच्या रहदारीचे अनेक प्रश्न सुटू शकणार आहेत.