Sunday, November 24, 2024

/

नद्या आणि रस्ते  विकासानेच शक्तिशाली भारत निर्माण शक्य – नितीन गडकरी

 belgaum

देशातील नद्या आणि रस्ते महा मार्गांच्या विकासानेच शक्तिशाली भारत निर्माण होणे शक्य आहे असे मत केंद्रीय परिवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे . बेळगावातील सुवर्ण विधान सौध येथील सेंट्रल हॉल मध्ये बेळगाव ते खानापूर ३० कि मी राष्ट्रीय महा मार्गांच्या कामाचा शुभारंभ केल्यावर  आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार सुरेश अंगडी ,राज्यसभा सदस्य डॉ प्रभाकर कोरे आमदार संजय पाटील ,महांतेश कवटगीमठ, माजी मंत्री उमेश कत्ती, जिल्हाधिकारी एस जिया उल्ला आदी उपस्थित होते.

NItin gadkari

बेळगाव ते खानापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण पहिल्या टप्प्यात ९०० कोटींच्या कामाचे भूमिपूजन  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नव्याने बांधण्यात येणारे रस्त्यांचा दर्ज अति उत्तम असून जवळपास दोन पिढ्या या रस्त्यांचा दर्जा टिकेल असे सांगत  देशाच्या विकासात  एकूण १२ एक्स्प्रेस हायवे बनवणार असल्याचेही ते म्हणाले.  नेपाळ आणि चीन देशाला जोडणाऱ्या नवीन रस्त्यांची देखील प्रस्ताव तयार केले असल्याचे ते म्हणाले.

पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सुमारे २ लाख कोटी रु पाणी शुद्धीकरणासाठी खर्च करण्यात येणार आहे याचा लाभ शेतकरी आणि पिण्याचे पाणी यास  होणार आहे . समुद्राचे पाणी नद्यात आणून नदी जोडणी प्रकल्पास केंद्र सरकार अधिक भर देणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं .

सौंदत्ती यरगटटी बागलकोट या राज महामार्गास हैद्रबाद पर्यंत वाढवून याच राष्ट्रीय महामार्गाट रुपांतरीत करा अशी तर गोटूर अथणी हा राजमार्ग विजापूर पर्यंत वाढवा अशी देखील मागणी  यावेळी खासदार अंगडी यांनी केली .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.