हलगा मच्छे बाय पास रोड च्या भूसंपादनात सुपीक जमिनी बळकावू नका आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे असे सांगणाऱ्या शेती बचाओ समितीच्या शेतकऱ्यांना केंद्रीय परिवहन आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी फटकारले आहे.
सोमवारी सायंकाळी नितीन गडकरीं यांनी हलगा येथील सुवर्ण विधान सौध मध्ये बेळगाव खानापूर राष्ट्रीय महा मार्ग भूमिपूजन करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी हलगा सुवर्ण विधान सौध मध्ये शेतकऱ्यांनी गडकरी यांची भेट घेतली होती.
हलगा मच्छे रस्ता सुपीक जमीन बळकावण्या ऐवजी बंजारा जमिनीतून हलगा मच्छे बायपास रस्ता करा अन शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली असता गडकरी यांनी तुम्ही कोर्टात जा काहीही करा आम्ही रस्ता करणारच अशी आडमुठी भूमिका घेतली अन विनंती करणाऱ्या बळी राजाला फटकारल आहे.
शेती बचाओ समितीचे बाळाराम पोटे, अरुण चव्हाण पाटील, अमृत भाकोजी, शेतकरी संघटनेचे नारायण सावंत,भ्रष्टाचार निर्मुलन परिवारचे सुजित मूळगुंद आदी यावेळी उपस्थित होते. सुपीक जमिनी बळकावणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखे होईल असं सांगणाऱ्या शेतकऱ्यांच म्हणणं देखील ऐकून घेतलं नाही त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत.