कपिलेश्वर उड्डाण पुलावरून उडी टाकून एक युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. सायंकाळी वळीव पाऊस सुरु असताना अंदाजे 35 वर्षीय तरुणाने उड्डाण पुलाच्या भिंती वरून उडी टाकली त्यात त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत होऊन घटनास्थळीच त्याच निधन झालं आहे.
भांदुर गल्लीच्या बाजूने उडी टाकून आत्महत्या केलेल्या युवकाची अजून ओळख पटली नसून घटनास्थळी पोलीस पंचनामा करून ओळख पटवण्याचे काम करताहेत.मार्केट पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. शहरात रेल्वे ट्रॅक वर आत्महत्त्या होण्याचे प्रमाण वाढत असताना रेल्वे उड्डाण पूल देखील सुसाईड पॉईंट बनला आहे.
माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस अम्ब्युलन्स पाचारण केले.