अनेक वर्षांपासून प्रलंबीत खानापूर मार्गे बेळगाव गोवा रस्ता रुंदीकरणाची सुरुवात लवकरच होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने दोन भागात हा रस्ता पूर्ण करण्याची निविदा दोन वेगवेगळ्या कंपनींना दिली आहे. या रस्त्यावर एक टोल नाकाही असणार आहे.
बेळगाव ते खानापूर या तीस किमी च्या टप्प्याचे काम अशोक कन्सेशन लिमिटेड कंपनीला देण्यात आले असून ८५६.२० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. वनविभागानेही याला परवानगी दिली आहे.
खानापूर ते अनमोड या भागात दुहेरी मार्ग निर्मितीचे काम दिलीप बिल्डकोन लिमिटेड या कम्पनीला देण्यात आले आहे. ५२.३ किमीच्या या रस्त्याचे काम करण्यास ४८६.७८ कोटी खर्च येणार आहे.