केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी हे सोमवारी १९ रोजी बेळगाव दौऱ्यावर येणार असून हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या कामासह एकूण दोन राष्ट्रीय महा मार्गावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार आहेत.
हलगा खानापूर बायपास रस्ता सह खानापूर गोवा सीमेवरील रस्ता कामास सायंकाळी पाच वाजता सुरुवात करणार असल्याची माहिती खासदार सुरेश अंगडी यांनी दिली आहे. शहरातीलरहदारी वर नियंत्रण ठेवण्यासाठी हलगा मच्छे बायपास रस्ता करण्यात येणार असून एकूण ३० की मी चौपदरीकरण असलेल्या या रस्त्याच्या कामास ८५६ कोटी खर्च करण्यात येणार आहे तर खानापूर राम नगर या राष्ट्रीय राज मार्गावरील रस्ता बनवण्यास ४८६ कोटींचा निधी खर्च होणार आहेत.
सौंदत्ती यरगटटी बागलकोट या राज महामार्गास हैद्रबाद पर्यंत वाढवून याच राष्ट्रीय महामार्गाट रुपांतरीत करा अशी तर गोटूर अथणी हा राजमार्ग विजापूर पर्यंत वाढवा अशी देखील मागणी केंद्रीय मंत्र्याकडे करणार असल्याचे अंगडी म्हणाले. मार्च महिन्याच्या शेवटी जुना पी बी रोड चा उड्डाण पूल लोकार्पण केला जाईल या शिवाय गोगटे सर्कल ते संभाजी चौक पर्यंत रस्ता रुंदीकरणाचे देखील काम हाती घेणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.