बापट गल्ली येथे बहुमजली पार्किंग तळ उभारण्याचा प्रस्ताव मागिल १२ वर्षांपासून धूळ खात पडून आहे. आता पूर्वीपेक्षा स्वतंत्र आणि पूर्णपणे वेगळा २ कोटी खर्चाचा नवा आराखडा पुढे आणण्यात आला आहे. दोन मजली इमारत आणि दोन्ही बाजूने रॅम्प असे त्याचे स्वरूप आहे.
या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर ४० कार पार्क करता येणार आहेत. रामदेव गल्ली कडून प्रवेश करण्यासाठी आणि कडोलकर गल्ली व आर आर बार काढून बाहेर जाण्यासाठी रॅम्प असतील.
यापूर्वी आठ मजली पार्किंग इमारतीसाठी निबिड काढण्यात आली होती, पण निर्धारित दरात ती इमारत बांधून देण्यास कुणीच पुढे आले नाही, ४.३५ कोटींची निविदा कुणीच भरली नाही कारण भरली नाही कारण बांधकामाचा खर्च दुप्पट येण्याची शक्यता आहे.
आता नवीन आराखड्यानुसार बांधकामाचा खर्चही निम्याने कमी झाला आहे. आणि प्रकल्प उभारला तर पार्किंगची समस्या काही प्रमाणात सुटू शकते.
या भागातील जुनी झाडे तोडण्याची परवानगी फॉरेस्ट खात्याने दिली आहे.नव्या आराखड्यावर अजून काम सुरू आहे, तो प्रत्यक्षात येईल की नाही याबद्दल आत्ताच काही माहिती मिळू शकलेली नाही.