उन्हाळ्यात पक्षांना जास्त पाणी लागते, ते मिळाले नाही तर पक्षांचा तडफडून जीव जाण्याचा धोका असतो,यासाठी गरज असते पक्षांसाठीच्या पणपोईची. ही गरज ओळखून मेड क्रिएटिव्ह वर्क्स या संस्थेने टाकाऊ प्लास्टिक बाटल्यापासून पक्षांसाठी पाणपोई बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा विशेषतः लहान मुलांसाठी आहे.
उद्या दि १८ रोजी सकाळी १० वाजता हनुमान नगर येथे रिद्धीज मेगा किचन हॉटेल जवळ ही कार्यशाळा आहे. उन्हाळ्यात पक्षांना पाणी देऊन पक्षीजीवन वाचवण्यासाठी मुलांमध्ये जागृती करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. पर्यावरण आणि पक्षी जीवनबद्दल प्रेम व मित्रत्व तयार करणे हा सुद्धा उद्देश आहे. नागरिक आपल्या मुलांना घेऊन जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊ शकतात.
याठिकाणी पाणी घालून ठेवण्यासाठी टाकाऊ बाटल्यांची पाणपोई बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाईल. तसेच मुलांनाही ते बनवण्याची संधी दिली जाईल. याठिकाणी बनवलेल्या पाणपोया शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.प्यास फौंडेशन च्या सहयोगातून ही कार्यशाळा होणार आहे. यामुळे सहभाग व साहित्य मोफत आहे.