३१ मार्च रोजी बेळगाव येथे शरद पवार यांची सभा घेणे निश्चित झाले आहे. सिपीएड मैदानावर ही सभा सायंकाळी चार वाजता होणार आहे. २ लाख रुपये भाडे घेऊन सभेस मैदान देण्यात आले आहे. आता परवानगी पोलीस आयुक्त यांनी देण्याची वाट पाहावी लागणार आहे.
पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याचे भवितव्य अधांतरी करण्याचा प्रयत्न सुरू होता.
या मेळाव्याला जागाच मिळू नव्हे अशी व्यवस्था करण्यात आली होती.
ज्योती कॉलेज मैदानास परवानगी देणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने टाळले होते. येथे फक्त शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रम होऊ शकतात असे सांगून राजकीय कार्यक्रम करायचा असल्यास डिफेन्स इस्टेट बंगळूर कडे बोट दाखवण्यात आले होते.
मात्र आता मैदानाचा प्रश्न मिटला असून आता लाखो लोकांच्या उपस्थित सभा आणि मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रविवारी होणार कार्यकर्त्यांची बैठक
रविवारी सकाळी 11 वाजता सी पी एड मैदाना वर पवारांच्या सभेच्या बैठकीच्या तयारी साठी युवकांनी जमा व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलं आहे.