इंदिरा कॅन्टीन चालवणाऱ्या कंत्राटदाराला खर्च पुरवण्याची जबाबदारी सरकारने महानगरपालिकेवर दिली आहे. यामुळे मनपाला दरमहा ६० लाखाचा बोजा सोसावा लागणार आहे.
सध्या एकच इंदिरा कॅन्टीन सुरू आहे. लवकरच आणखी ५ सुरू होणार आहेत. यामुळे दरमहा येणारा खर्च मनपावर बसणार आहे.
सरकारने एक आदेश बजाऊन मनपाला हा खर्च देण्याची सूचना केली आहे. कॅन्टीन बांधण्याचा खर्चही मनपाच्या खजिन्यातूनच करण्यात आला आहे. मनपा पैसे देणार जनतेने भरलेल्या करातून म्हणजेच लोकांनी दिलेल्या पैशाने लोकांनाच जेवण असा हा प्रकार असून श्रेय मात्र सरकार घेणार आहे.