अंबाभुवन सर्कल जवळ लवकरच पोस्टमन चा पुतळा उभारला जाणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने साऊथ टेलिग्राफ रोड च्या सौन्दर्यीकरणास सुरवात केली असून या रस्त्याच्या शेवटाला पोस्ट मुख्यालय आहे.
पोस्टमन ना आदर देण्यासाठी पोस्ट खाते या ठिकाणी पोस्टमन चा पुतळा उभारणार आहे. शोर्य चौकाच्या धर्तीवर हा चौक घडणार आहे.यासाठी ५० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. छावणी सीमा परिषदेच्या वतीने या चौकाचे सुशोभीकरण केले जाणार आहे .