पालिका आयुक्त शशिधर कुरेर यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले . शासनाने बदलीचा आदेश जारी केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ३६ केएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत कुरेर यांचे नाव आहे. बागलकोट येथे अप्पर जिल्हाधिकारी या पदावर त्यांची बदली झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
कुरेर यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी अद्याप नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. कुरेर यांच्या बदलीमुळे स्मार्ट सीटी योजनेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार याबाबतही शासनाकडून स्पष्ट आदेश नाही. कुरेर यांची बदली गेल्या आठवड्यात झाली होती, पण त्यांचा बदली आदेश मात्र जारी झाला नव्हता.
कुरेर हे सप्टेंबर 2016 साली महापालिका आयुक्तपदी रूजू झाले . त्याआधी ते बुडा आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले होते. स्मार्ट सीटी योजनेचे व्यवस्थापकीय संचालक मुलाई मुहीलन यांची बदली झाल्यानंतर कुरेर यांच्याकडे या योजनेची अतिरीक्त जबाबदारी देण्यात आली होती. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पण महापालिका आयुक्तपदी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार याबाबतची उत्सुकता कायम आहे. स्मार्ट सिटी योजनेवर नवे अधिकारी नेमले जाण्याचीही शक्यता आहे.