बूथ कमिटी बैठकीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या संघ परिवाराच्या जवळील असलेल्या दोन भाजप इच्छुकांवर माजी आमदार समर्थकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी घडली आहे. रामनाथ मंगल कार्यालयात दक्षिण भाजप च्या वतीने बूथ कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीवेळी हा प्रकार घडला आहे .
त्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भाजपचे पांडुरंग धोत्रे आणि सुनील चौगुले देखील गेले होते त्यावेळी माजी आमदारच्या वीस ते पंचवीस जणांच्या समर्थकानी तुमची इथे गरज नाही, इथे येऊ नका अशी अरेरावी करत मारहाण केली. अंगावरील शर्ट फाडले धोत्रे यांना मारहाण केली तर सुनील चौगुले यांना देखील धक्काबुक्की केली असल्याचा आरोप धोत्रे यांनी केला आहे. मारहाण होताच दोघेही सिव्हील इस्पितळात दाखल झाले होते .
सुनील चौगुले यांच्या कडे भाजपचे महानगर जिल्हा उपाध्यक्षपद आहे तर पांडुरंग धोत्रे जिल्हा भाजप कार्यकारिणीवर आहेत ते दोघेही दक्षिण भाजपच्या बूथ कमिटीवर आहेत त्यामुळे बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. टिळकवाडी पोलिसात धोत्रे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्या माजी आमदार सह धोत्रे आणि सुनील चौगुले देखील आमदारकी साठी इच्छुक आहेत ते बंगळूरू येथे तिकीट मिळवण्यासाठी लॉबिंग करताहेत दोघांचेही पारडे उमेदवारी साठी जड आहे त्यामुळेच माजी आमदार समर्थकांनी हल्ला केला असावा अशी देखील चर्चा होत आहे. चौगुले व धोत्रे यांनी तर आपल्या नेत्याला उमेदवारी मिळणार नसल्याच्या भीतीतूनच हा हल्ला झाल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
भाजप मधील हा वाद सर्वत्र चर्चेत आला आहे, मारहाण करणारे खरेच माजी आमदारांचे समर्थक होते की नाही हे पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे.