भारत पाकिस्तान अटारी सीमेवर फडकत असलेल्या राष्ट्र ध्वजाच्या उंचीएवढाच ११० मीटर म्हणजेच ३६० फूट उंचीचा राष्ट्रध्वज बेळगावात फडकणार आहे. बुडा कार्यालयाच्या प्रवेश द्वाराजवळ किल्ला तलाव येथे सोमवारी १२ मार्च रोजी सकाळी ८:३० वाजता या राष्ट्र ध्वजाचं अनावरण होणार आहे.
बेळगाव उत्तर चे आमदार फिरोज सेठ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उंच ध्वजाचा उदघाटन कार्यक्रमास काही तांत्रिक परवानग्या मुळें उशीर झाला होता सध्या ३६० फुटांचा उंच पोल तयार असून या पोल वर ध्वज ट्रायल बेस वर चढवण्यात आला होता आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत या ध्वजाचे अधिकृत उदघाटन केलं जाणार असल्याची शकयता आहे.या कार्यक्रमास पालक मंत्री रमेश जारकीहोळी देखील उपस्थित राहणार आहेत.
३६० फूट उंच असलेला हा ध्वज ९६००चौरस फूट असून ८०/१२० केवळ ध्वज फूट मोजता येईल .
या योजनेसाठी १ कोटी ५१ लाखांची तरतूद करण्यात आली होती लँडस्केपिंग साठी आणखी २.५ कोटी खर्च करण्यात आले आहेत.
अशी आहेत या ध्वजाची वैशिष्टये
३६० फूट किंवा ११० मीटर उंच असा हा ध्वज
८०/१२० फूट केवळ ध्वज मोजता येईल
बुडा कार्यालय प्रवेश द्वारा जवळ किल्ला टाळावा जवळ हा ध्वज बसवण्यात आला आहे
प्रोजेकट ठेकेदार – संजय देवराज भगत ( बजाज इलेक्ट्रीकल लिमिटेड)
कंपनीचे नाव – बजाज इलेक्ट्रिकल लिमिटेड
निधी खर्च – १ कोटी ५६ लाख ७६ हजार ५५२. ७६