शुक्रवारी बेळगाव शहरात रेल्वे ट्रॅक वर झालेल्या दोन आत्महत्यांनी सारे बेळगाव शहर हादरून गेले आहे. पाहिके ते तिसरे रेल्वे फाटक पर्यंतचा भाग सुसाईड पॊइंट म्हणून घोषित करण्यासारखी वेळ कमकुवत मनोवृत्तीच्या लोकांनी आणून ठेवली आहे.
सकाळच्या सत्रात तिसऱ्या रेल्वे गेट जवळ पहिली आत्महत्या घडली आहे. महेश भावकाणा सुतार ( वय ४५) असे त्याचे नाव आहे.
सायंकाळी ६.३० च्या सुमारास पहिल्या रेल्वे गेट जवळ घडलेली आत्महत्या अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली आहे. आत्महत्या करणारा लोकांनी आरडाओरड केली तरी न ऐकता पुढे गेला यामुळे रेल्वेच्या धडका बसून त्याचे मुंडके आणि शरीर वेगळे झाले.
त्याची ओळख अजून पटलेली नाही. या दोन आत्महत्यांनी बेळगाव रेल्वे पोलीस आणि यंत्रणांचा व्याप वाढवला आहे. उठसूट रेल्वे ट्रॅक वर जाऊन आत्महत्या करण्याच्या घटनांनी कमकुवत मनोवृत्ती बेळगाव मध्ये वाढल्याची गोष्ट समोर येत आहे.