मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अखेर कर्नाटक राज्याच्या वेगळ्या ध्वजाच अनावरण केलं आहे.प्रत्येक राज्याला वेगळा ध्वज असावा यासाठी सिद्धरामय्या यांनी लाल पिवळ्या आणि पांढऱ्या अश्या तिरंगी राज्य ध्वजाचे अनावरण गृह खात्याच्या कृष्णा कार्यालयात बंगळुरू येथे केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी अधिकृत ध्वज करण्या संबंधी नेमलेल्या समिती बरोबर चर्चा करीत हा ध्वज अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. ध्वज समितीने हा तिरंगी ध्वज अधिकृत करा असा प्रस्ताव सरकारला दिला होता त्यानुसार कन्नड संघटनांशी चर्चा करून आज ध्वज समिती ने दिलेल्या अहवालाची अमल बजावणी केली.
पिवळा पांढरा आणि लाल रंग मधोमध राज मुद्रा असलेला तिरंगा ध्वज अधिकृत मान्यता देण्यात ठरवलं आहे.या ध्वजाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे त्या नंतर अधिकृत मान्यता मिळणार आहे.
निवडणूक डोळ्या समोर ठेऊन कन्नड अस्मितेची मत मिळवण्यासाठी प्रादेशिक अस्मिता ध्वजाला अधिकृत मान्यता दिली असल्याचो टीका विरोधकांनी केली आहे.