३१ कोटी २७ लाख रुपये खर्चातून बेळगावचे बसस्थानक सीबीटीच्या बांधकामाचे काम सुरू आहे.स्कायवॉक आणि एसकेलेटर्स सारख्या अद्ययावत सोयी सीबीटीमध्ये मिळणार आहेत.
३ डिसेंबर २०१६ रोजी कामाला सुरुवात झाली आहे. सध्या ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यावर्षी डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण काम संपणार आहे. आधुनिक बसस्थानकात पार्किंग, स्वच्छता,ईलेक्टरीकल, विद्युत व्यवस्था या गोष्टी बरोबरच प्रवाशांसाठी आधुनिक व्यवस्था मिळणार आहे.
स्मार्ट सिटी लिमिटेड मधून बस स्थानकाला वेटिंग रूम, बेसमेंट पार्किंग, कार व दुचाकीला स्वतंत्र पार्किंग आणि स्कायवॉक मिळणार आहे.
*असे असेल बसस्थानक*
#८३८२.६ चौरस मीटर चे क्षेत्र
# बेसमेंट आणि त्यावर एकूण चार मजले
#२८ बस बे
#२९०५.५५ चौरस मीटर मध्ये रिटेल विक्रीची दुकाने
#२५९५ चौरस मीटर चा कमर्शियल स्पेस
#दुसऱ्या मजल्यावर रेस्टॉरंट साठी जागा
*पार्किंग सुसज्ज*
बेसमेंट मध्ये १३३ कार आणि ५१ दुचाकी पार्किंग ची जागा असेल. तसेच बस स्थानकावर दुचाकी पार्किंग साठी स्वतंत्र जागाही असणार आहे.
एकावेळी २८ बस पार्क करण्याची व्यवस्था राहील.