विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी दक्षिण भागात होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या बहुतेक कार्यक्रमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
शहापूर वडगाव आणि ग्रामीण भागात आज रंगपंचमी उत्साहात साजरी झाली पण शहरातील दक्षिण भागात इच्छुकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी कधी नव्हे ते रंगपंचमीसाठी मैदानाची व्यवस्था केली होती पण मराठी भाषिकांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या पैशाने स्वतःच्या गल्लीत आणि भागात रंग खेळणे पसंद केले त्यामुळे माजी आणि इतरांचा फज्जा झालेल दृश्य होती.
टिळकवाडी सारख्या भागात बाहेरून शिकायला आलेल्यांची संख्या जास्त असते त्यामुळे तिथे गर्दी होणे साहजिक आहे पण आज खरा कस होता त्याचा फज्जा झाला अशी चर्चा रंगली आहे.राजकीय उद्देश्य समोर ठेऊन आयोजित केलेले दोन्ही कार्यक्रम अयशस्वी झाले जनता दोघांनाही ओळखली आहे हेच यावरून दिसून आले आहे.