कर्नाटकातील पत्रकार आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात तब्बल सहा महिन्यांनंतर पहिल्या आरोपीला विशेष तपास पथकाने जेरबंद केले आहे. त्या आरोपीचे नाव के. टी. नवीनकुमार (३७) असे असून त्याला १८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.
नवीनकुमार हा मड्डूर येथील रहिवासी असून त्याच्याकडे काही बुलेटस् सापडल्या आहेत. लंकेश यांच्या हत्येत आपला सहभाग असल्याची कबुली नवीनकुमार याने पोलिसांकडे दिली आहे.