Monday, January 6, 2025

/

स्वताच्या उमेदवारीसाठी प्रोजेक्शन नाही – पंढरी परब

 belgaum

महा पालिकेत गेली दोन टर्म नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले सध्या पालिकेचे गट नेते पंढरी परब हे देखील यावर्षी बेळगाव दक्षिण मतदार संघातून समितीचे प्रबळ उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. बेळगाव liveने त्यांच्याशी संपर्क साधला त्यांची मुलाकात घेतली, त्यावेळी त्यांनी स्वार्थासाठी निवडणूक नाही तरीही वाद, बंडखोरी अशा सर्व अडचणींना तोंड देत हा लढा सुरू आहे त्यातील आपण एक प्रामाणिक उमेदवार आहोत, त्यामुळे मलाच विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मी स्वतःला कधीच प्रोजेक्ट करणार नाही अशी भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती हा त्यागाचा लढा आहे. सीमाप्रश्नाचा हा लढा बेळगाव महाराष्ट्राचे आहे या मुद्द्यावर सुरू असून त्यासाठीच लोकशाही मार्गाने लढा व न्याय मिळवण्यासाठी निवडणूक लढवणे सुरू आहे कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी त्याग पत्करला आहे. मधू कणबर्गी यांच्या सारखे अनेक जण आजही अनवाणी फिरत आहेत. निवडणुकीतील उमेदवार हे या सर्व कार्यकर्त्यांचे प्रतीक असतात. यामुळे मलाच उमेदवारी असं न म्हणता आपल्यातील एक प्रतीक नेतृत्वाच्या दृष्टीने निवडून काम करणे महत्वाचे आहे अस देखील ते म्हणाले.

Parab pandhari

शाळेत असल्यापासून मला कळायला लागलं की अन्याय काय आहे. लहान असताना पासून आम्ही या चळवळीत मोर्चात सहभागी आहे. बळवंत राव सायनाक ते संभाजी पाटील यांच्या सर्व निवडणुकीत मी सहभागी आहे. कार्य केले आहे.काही पराभव बघितले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशी फोड झाल्यानंतर आमच्या प्रयत्नांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
उमेदवारी न मिळणे हे महत्वाचे नाही. जेंव्हा महाराष्ट्र एकीकरण एक उमेदवार जाहीर करते तेंव्हा पूर्ण प्रामाणिक पणे काम करणे महत्वाचे आहे. उमेदवारी कुणाला मिळते किंवा मला न मिळते हा प्रश्नच येत नाही. अन्यायाविरुद्ध लढताना आपण प्रामाणिक राहून उमेदवार निवडून देणं हे कर्तव्य आहे अस देखील भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले की ‘एकी’ हे सर्वांचे कर्तव्य आहे. आज तरुण सोशल मीडियावर जे काम सुरू केलं आहे ते उत्तम आहे. म ए समिती हा एक परिवार आहे. काहीवेळा मतभेद होतात, ते विसरून काम करणे हे कर्तव्य आहे.पालिकेत मध्ये नगरसेवक, गटनेता म्हणून काम करताना मी एकी राखण्याचा प्रयत्न केला.विकास साधताना एकीकरण समितीचे नगरसेवक सर्व पोट जातींना सोबत घेऊन जातात हे माही गेल्या चार वर्षात मराठी महापौर करून दाखवले आहेत.

संभाजीराव पाटील यांना आमदार म्हणून निवडून आणलं तेंव्हा टन मन धन हरपून काम केलं आहे. आमिष, जाती पातीच राजकारण करण्याचं काम आपल्यावर विश्वास नसलेले करतात.सहली, भेटवस्तू, सत्कार असल्या आमिशांचा काहीच फरक पडणार नाही. जनतेचा कौल जर असेल तर आणि आजवर जे काही कर्तव्य पार पाडलय तेच मला महत्वाचं आहेअसेही त्यांनी पुढे नमूद केल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.