केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी बेळगावातील बेकायदेशीर कत्तल खान्याबद्दल पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरून दम दिल्यावर जागे झालेल्या सरकारी यंत्रणेने हळूहळू कत्तल खान्यावर कारवाईस सुरुवात केली आहे.
सोमवारी सकाळी पालिका आयुक्त एम शशिधर कुरेर यांच्यासह पालिका आरोग्याधिकारी नाडगौडा यांनी कसाई गल्लीतील कत्तल खान्याची अचानक पहाणी करून स्वच्छता राखावी आणि पालिकेच्या नियमांचे पालन करावे अशी सूचना दिली आहे.
कॅम्प मध्ये असलेल्या अधिकृत कत्तल खान्यात जनावरांची कत्तल करून मांस पुरवठा केला जावा अशी सूचना देत कसाई गल्लीत अधिकृत कत्तल हवा असेल प्रदूषण महा मंडळ आणि पालिकेची रितसत परवानगी घेऊनच कत्तल खाने सुरू करावेत न होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील कुरेर यांनी दिला आहे.
ज्या ठिकाणी दहा हुन अधिक जनावरे कापली जात असतील तर त्यांची नोंद कत्तल खाना अशी होते तेंव्हा आम्ही तीन चार जागांची पाहणी केली त्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
चिकन मटण विक्रीस परवाना आवश्यक
शहरात 120 चिकन दुकानानी रीतसर परवानगी घेतलेली आहे उर्वरित चिकन मटण दुकानदारांनी पालिकेत शुल्क भरून दोन दिवसात रीतसर परवानगी घ्यावी अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असा देखील त्यांनी इशारा दिला आहे. पालिकेच्या पहाणी दौऱ्या दरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.