belgaum

कणकुंबीत रंगलाय नाट्य आविष्कार

0
252
Natya
 belgaum

होळीच्या सणाचे औचित्य साधत कणकुंबी परिसरात लोक कलेला बहर आला आहे.भरगच्च भरलेली प्रेक्षकांगृह, रंगलेले नाट्यकर्मी आणि नाटयोत्सवाची परमोच्च परिणीती या सर्वांच मिलन कणकुंबीत अवतरलं आहे.

Natya

होळीचा सण हा कोंकण भागातला मोठा सण!तब्बल पाच दिवस चालणारा हा उत्सव, श्रमाच्या धगाड्यातुन विसावा मिळवायचं साधन, आज रविवारी एका बाजूला बेळगावात नाट्य परिषदेची निवडणूक मतदान रंगल आली असताना कणकुंबीच्या मातीशी इमान सांगणारे,श्रमजीवी शेतवाड्यात राबणारे, खरं नाटका मना पासून प्रेम करणारे नाट्य कर्मी जीव तोडून रंग देवतेची सेवा करत होते.
गावातीलच संच हस्तलिखित संहिता,पुरुषानेच केलेली स्त्री पात्राची कामे,आणि उत्स्फुर्त अभिनय,उसळणार प्रेक्षागृह ही रंग देवतेची सेवा.दुष्ट लागेल अशीच खरी लोककला नाट्य जिवंत ठेवणारी परंपरा वाखाण्या सारखी!

पाच दिवस चालणाऱ्या होळीच्या दुसऱ्या दिवशी फार्स,नाटक,घोडे मोडणी अश्या  कार्यक्रमांनी कणकुंबीत होळी उत्सव साजरा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.