अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेतून मुंबई शाखेसाठी सदस्य पदी झालेल्या निवडणुकीचा निकाल रविवारी रात्री लागला. मतमोजणी पूर्ण झाली असली तरी निकाल अधिकृत रित्या अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही . मात्र बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनीच बाजी मारली आहे.
आगामी सात मार्च रोजी मुंबईत हा निकाल अधिकृत रित्या जाहीर केला जाईल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या आसावरी शेरी यांनी दिली.
शहापूर कोरे गल्लीतील सरस्वती वाचनालयात सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 पर्यंत चुरशींने मतदान झालं होत. यानंतर मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी नंतर निकाल इथे जाहीर करायचे नाही असा निर्णय घेण्यात आला.
बेळगाव नाट्य परिषद शाखेच्या एकूण 518 मता पैकी 410 सदस्यांनी मतदान केलं होतं. 403 मत वैध झाली असून 7 मते बाद झाली असल्याची माहिती रत्नागिरी हुन आलेल्या निवडणूक अधिकारी आसावरी शेरी यांनी दिली आहे.
रात्री दहा पर्यंत मतदान केंद्रावर निकाल ऐकण्यासाठी गर्दी जमली होती शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांच्या नेतृत्वात कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
जरी अधिकृत निकाल सात मार्च ला जाहीर होणार असला तरी बेळगाव live च्या हाती नाट्य परिषदेचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत वीणा लोकूर विजयी झाल्या असून त्यांना 197 मते तर वृषाली मराठे यांना 162 मते तर राजू सुतार यांना केवळ 44 मतांवर समाधान मानव लागलं आहे.35 मतांच्या फरकाने वीणा लोकूर यांनी ही लढत जिंकली असून राजू सुतार हे जायंट किलर ठरले आहेत