अनिमल वेल्फेयर खात्याने दिलेल्या फिर्यादीवरून बेळगाव पोलिसांनी तीन कत्तल खान्यांच्या मालकांना अटक केली आहे. ये तीनही कत्तल खाने बंद करण्यात आले आहेत.
सेव्हन स्टार ग्रुप, निल ऍग्रो फॅक्टरी आणि श्रुष्टी ऍग्रो व कोल्ड स्टोरेज या तीन ठिकाणी कारवाई केली आहे. बरफवाला कोल्ड स्टोरेज, बरफवाला फूड्स, चारिष ऍग्रो, फिझा एक्सपोर्ट्स व एस बी ट्रेडर्स यांची चौकशी सुरू आहे.
एसीपी आर आर कल्याणशेट्टी यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मोबिन बेपारी, मिनाझ चांद शेख, नायिम याकूब यांना अटक झाली आहे.