Wednesday, January 1, 2025

/

‘एकी आणि संघटना बळकटीसाठी’ प्रयत्नशील मनोहर होसुरकर

 belgaum

दक्षिण मतदार संघातील समितीच्या प्रबळ दावेदारांच्या मुलाखातीच सत्र पुढे नेताना जुने बेळगाव भागातील कष्टकरी कुटुबातून पुढें आलेल्या ए पी एम सी च्या माजी अध्यक्ष मनोहर होसुरकर यांच देखील कार्य जोरात सुरु आहे ते देखील दक्षिण मतदार संघात प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत. दक्षिण मतदार संघात कार्यकर्त्यात आलेली मरगळ दूर करून समिती संघटनेला फायदा व्हावा यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरातून एकीसाठी प्रयत्नशील असल पाहिजे घरातून आपल्या नातलग त्यांनतर गल्ली आणि वार्डात एकीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशी त्यांची भूमिका त्यांनी मांडली आहे. आगामी २० मार्च रोजी दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र व्यासपीठावर आणून जुने बेळगाव येथे युवकांचा मेळावा करण्याची जोरदार तयारी ते करताहेत.

manohar hosurkar
गेले दोन महिन्या पासून वडगाव जुने बेळगाव भागातील इतर पक्षात विखुरलेल्या सर्व मराठी भाषिक युवकांना एकत्रित करून एकीसाठी सर्वसमावेशक बैठका घेण्यात ते अग्रेसर आहेत. एकीकडे राष्ट्रीय पक्ष सगळीकडे खिरापती वाटत असताना संघटना म्हणून समिती एकत्रित आली पाहिजे हाच आमचा मुख्य उद्देश्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मारवाडी सिंधी परीट साळी कुरबर आणि मुस्लीम या सर्व समाज मराठा समाज आणि समिती पासून दूर गेले आहेत त्यांना परावृत्त करून पुन्हा समितीकडे वळवणे हा माझा मुख्य उद्देश्य असेल जनजागृती बैठकीतून देखील आम्ही सर्व इतर समाजातील प्रतिनिधींना एकत्रित घेत आहोत असे त्यांनी सांगितले. मला उमेदवारी मिळण्या पेक्षा समिती संघटना कशी बळकट होईल एकी कशी होईल याकडे माझे जास्त लक्ष असणार आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

ते पुढे म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीचे २००५ साली अध्यक्षपद भूषवलेल्या मनोहर होसुरकर अनेक शेतकऱ्यांना मदत करून त्यांनी वेगळी छाप पाडवली आहे गेल्या कित्येक वर्षा पासून समितीच्या लढ्यात आंदोलनात सक्रीय आहे असे देखील त्यांनी म्हटलं आहे. उमेदवारी पेक्षा संघटना म्हणून समिती बळकट व्हावी हे आमचे मुख्य उद्देश्य आहे. निवडणुकीत समिती ची उमेदवारी कोणालाही मिळो आमचे कार्य हे जोमात चालुच ठेवणार आहे एकनिष्ठ पणे कार्य करू त्याच प्रमाणे समितीचा उमेदवाराचा कसा विजय होईल याकडे जातीने लक्ष दिले जाईल.

संपर्क – मनोहर होसुरकर

०९४४८२७४५०९

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.