अखिल भारतीय नाट्यपरिषदेवर जाण्यास आपण पात्र उमेदवार आहोत. या ठिकाणी जाऊन काम करण्यासाठी मतदानाने सहकार्य करण्याची गरज आहे. मतदारांनी आपल्याला सहकार्य करावे असे आवाहन निवडणुकीतील उमेदवार वृषाली मराठे यांनी केले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेळगाव live शि संपर्क साधला.कोणतेही राजकारण न करता, नाटक- रंगभूमी आणि कलाकारांसाठी काम करण्याची आपली इच्छा आहे. बेळगावची रंगभूमी सशक्त करणे हा आपला प्रमुख उद्देश आहे. असे त्या म्हणाल्या.
कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणे, रसिकांना कमी आणि सवलतीच्या दरात नाटक उपलब्ध करून देणे, बालनाट्य परिषद, संमेलने, कार्यशाळा, प्रशिक्षण सारखे उपक्रम राबविणे याचबरोबर बेळगावातील कोणत्याही नाट्य संस्थेला कोणताही भेदभाव न करता मदत करणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
नाटक कलाकार, कवयित्री, रसिक आणि साहित्य व नाट्य सेवक ही ओळख आहे. या ओळखीचे परिवर्तन नाट्य परिषदेत सदस्य रुपात होऊन भरघोस काम करण्याची संधी मिळावी ही त्यांची अपेक्षा आहे.